अंधेरी करांचे पाणी संकट संपले .
अंधेरी जोगेश्वरी विलेपार्ले मधील नागरिकांचे टॅंकरचे पैसे पालिकेने द्यावे - जितेंद्र जाणवले (शिवसेना उप विभाग प्रमुख)
*नागरिकांचे टॅंकरचे पैसे पालिकेने द्यावे अशी मागणी जितेंद्र जानवले यांनी मागणी केली आहे .
गेली तीन दिवस उपनगरातील *सांताक्रुझ* *जुहू* *विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी भागात नागरिक पाण्याविना होते यात चूक कोणाची होती पाणी नसल्यामुळे नागरिकांनी *टँकर* ने पाणी मागवले तेही *जादा* पैसे देऊन .
पालिका पाणीखाते बिल भरणा उशिरा केले तर नळ जोडणी कापते किंवा व्याज लाऊन बिल पाठवते नाईलाजास्तव ते नागरिकांना भरावे लागते कारण चूक नागरिकांची असते .
पण गेले तीन दिवस पाणी नव्हते त्या मुळे पैसे देऊन नागरिकांनी टँकरने पाणी आणले ही चूक कोणाची *पालिकेची* तर भरपाई घ्यावी दिली पाहिजे .आणि या तीन दिवसात पालिकेला नागरिकांना *टँकरच्या* बिलाचे पैसे बिल तपासून द्यावे लागेल अशी जितेंद्र जाणवले यांनी पालिकेला मागणी केली आहे आता या मागणी चे काय होणार ते पाहावे लागेल.