सौ मनीषा टेमकर यांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारने केले सन्मानित





८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेने स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरित

 

 

सौ मनीषा टेमकर यांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारने केले सन्मानित .

 

 

 

प्रतिनिधी -  ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्था चे अध्यक्ष शैलेंद्र (आबा) बेल्हेकर  यांच्या वतीने शिक्षक भवन , हॉल नंबर २ , पत्रकार भवन पाठीमागे गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे स्त्रीशक्ती सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

स्त्री शक्ती सन्मान वितरण सोहळ्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिलच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता ताई हर्षवर्धनजी पाटील, पुण्याच्या उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेंडगे, संस्था अध्यक्ष शैलेंद्रआबा बेल्हेकर , स्थायी समितीच्या सदस्या सौ.उज्वलाताई जंगले, अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन आबणे उपस्थितीत पार पडला.

 

मुंबईतील सौ मनीषा टेमकर यांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . मनीषा टेमकर करत असलेले कार्य गेल्या २० वर्षांपासून " मनीषा'स आर्ट क्राफ्ट अँड ब्युटी अक्यडिमी "  द्वारे वर्षातून शेकडो महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देत आहेत . या मध्ये ज्वेलरी मेकिंग , ब्युटी पार्लर कोर्स , फ्लॉवर , बुके , बॅग मेकिंग , दिवाळी तोरण , रांगोळी विविध प्रकारचे पेंटिंग्स व हस्तकलेच्या वस्तू बनण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे . मनीषा टेमकर यांच्या या कार्यामुळे बेरोजगार युवक व युवतींना तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास तसेच रोजगार प्राप्तीसाठी व स्वतःचा व्यवसाय व उद्योग धंदा करण्यासाठी  मदत करतात आणि समाज कार्यात नेहमीच पुढे येऊन काम करत असतात.

 

मनीषा टेमकर यांचे काम खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कामाचा सन्मान आहे आणि आजच्या पिढीतील महिलांना त्यांचा कामामुळे प्रेरणा मिळत असते.

 

सौ मनीषा टेमकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार व  नेशन्स प्राईड बुक ऑफ रेकॉर्ड ' यांच्या द्वारे प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

 

 यशोभारत टाइम्स सोबत बोलताना मनीषा टेमकर यांनी सांगितले कि मी अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्था चे संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्रआबा बेल्हेकर यांचे आभार मानले तसेच  या कार्यक्रमासाठी त्यांच्या कुटंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. त्यांचे वडील भगवान मंजाबा थोरात आई  कमल भागवत थोरात यांचा आशीर्वाद आहे म्हणून मला  पुरस्कार मिळाला म्हणून मी माझा हा पुरस्कार त्यांना समर्पित करते व आज मी जे काही आहे ते माझ्या आई वडील यांच्या मुळे आहे आणि इथून अजून हि चांगल्या प्रमाणे आणि समाजातील लोकांसाठी चांगले काम करत राहीन असे सांगितले.




 


 

Popular posts