संजय कदम (अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक)
सुनिल जैन खाबिया (अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक )
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त भव्य दिव्य "अंधेरी महोत्सव चे आयोजन.
संजय कदम व सुनिल खाबिया यांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मध्ये जीव आणला- गजानन किर्तीकर खासदार मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा
अंधेरी पश्चिम विधानसभा मध्ये पहिल्यांदाच होत आहे भव्य दिव्य अंधेरी महोत्सव
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त भव्य दिव्य "अंधेरी महोत्सव २०२०" चे २२ जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
अंधेरी पश्चिम विभागातील खेळाडूंसाठी २२ व २३ जानेवारी रोजी *भगवा चषक* भव्य क्रिकेट स्पर्धा, महिला खेळांडूंसाठी २२ जानेवारी रोजी *रणरागिणी चषक* कब्बड्डी स्पर्धा, सर्व वयोगटांतील खेळाडूंसाठी २३ व २४ जानेवारी रोजी *लॉन टेनिस* स्पर्धा आयोजन केले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त २३ जानेवारी ला मुंबईत प्रथमच आगळी वेगळी बीच वॉकथॉन चे आयोजन जुहू चौपाटीवर केले असून हा महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे.
#walkforhinduhrudysamrat बीच वॉकथॉन मध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. २५ जानेवारी रोजी तरुणाईचे आकर्षण विविध गटातील स्पर्धकांसाठी *अंधेरी श्री २०२०* शरीसौष्ठव स्पर्धा, २६ जानेवारी रोजी समाजकार्य व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना *गौरव अंधेरीचा* पुरस्कारवितरणाचा सन्मान सोहळा, विभागप्रमुख / आमदार ॲड. अनिल परब साहेब महाराष्ट्र राज्याच्या परिवहन / संसदीय कार्य मंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल जाहीर सत्कार व आपल्या मातीतील पारंपारिक लोककला व पराक्रमी इतिहासाची गाथा सांगणारा *गर्व महाराष्ट्राचा - लोककलेचा खजिना* या सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
*अंधेरी महोत्सव २०२०* ला विभागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महोत्सव यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आयोजक शिवसेना अंधेरी पश्चिम चे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया हे कसून मेहनत घेत आहेत .
शिवसेना, युवासेना, युवतीसेना, ग्राहक संरक्षण कक्ष व शिव सहकार सेनेचे पदाधिकारी एकजुटीने काम करत आहेत. समस्त अंधेरी प. मधील रहिवाशांसाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा इ. मनोरंजनाची अस्सल मेजवानी असलेला महोत्सव २२ जानेवारी पासून आपल्या भेटीला येत आहे.