मुंबईत तबलिगी जमातच्या १५०जणांवर गुन्हे दाखल

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांना स्वत:हून समोर येऊन उपचार करून घेण्याचं आवाहन करूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात अखेर मुंबई महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाला तबलिगी जमातचे काही कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर हे लोक मुंबईत आले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकांना स्वत:हून स्वत:ची माहिती देण्याचं आणि उपचार करून घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही कोणीही समोर न आल्याने महापालिकेने अखेर आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन सुमारे १५० तबलिगींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.