पत्रकारांना पंचवीस लाखाचा कौटुंबिक विमा देण्यात यावा* - यशवंत पवार (पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष)


*पत्रकारांना पंचवीस लाखाचा कौटुंबिक विमा देण्यात यावा* - यशवंत पवार (पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष)


 



सोलापूर (प्रतिनिधी ) जगाच्या पाठीवर कोरोना या मारी ने धुमाकूळ घातला असून या संपूर्ण परिस्थितीत प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे सोलापूर जिल्ह्यात करोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया व  प्रिंट  मीडिया चे पत्रकार गल्लोगल्ली फिरून वार्तांकन करत आहेत जनतेच्या भल्यासाठी व राष्ट्राच्या हितासाठी आपले संसार आणि कुटुंब बाजूला ठेवून पत्रकारांची भूमिका जनजागृती करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे मात्र अशा पत्रकारांना कोणताही आर्थिक आधार नसल्याने पत्रकारांची आर्थिक स्तिथी अत्यन्त नाजूक असून कोरोना बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार डॉक्टर नर्स, पोलीस कर्मचारी  वैद्यकिय क्षेत्रातील घटकांना भरीव आर्थिक तरतूद केली असून  याबाबत पत्रकारांसाठी कोणतीही तरतूद नाही.


 


ही बाब गंभीर असून सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोना हा जीवघेणा आजार माहिती असून देखील पत्रकार वृत्तसंकलन करत आहेत आज प्रशासन आणि जनता यामधील दुवा म्हूणन पत्रकार काम करत असून अश्या बिकट परिस्थितीत पत्रकारांना कोरोना ची बाधा होऊन जीव गमवावा लागला तर पत्रकारांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होईल रस्त्यावर येईल  अल्प मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठया प्रमाणात असून त्यांना इतर कोणताही आर्थिक आधार नाही अश्या पत्रकारांना कोरोना या रोगाची बाधा झाली तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबाची परवड होईल.



*तरी मा जिल्हाधिकारी जातीने लक्ष घालून   सोलापूर जिह्यातील पत्रकारांना  कोरोना बाबत खबरदारी म्हूणन पंचवीस लाख रुपयांचा कौटुंबिक विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे*


Popular posts
खासदार मा. श्री गजानन कीर्तिकर साहेबांच्या माध्यमातून *शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम* करीता ऑक्सीजन संकेन्द्रक (Oxygen Concentrator) भेट.
Image
शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ची  कौतुकास्पद कामगिरी
Image
जितेंद्र जानावळे उपविभागप्रुख यांनी प्रवीण परदेशी साहेब मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना केली तक्रार
Image
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त  भव्य दिव्य "अंधेरी महोत्सव चे आयोजन.
Image