कुर्ल्यातील कराची हायस्कूल चा कृतज्ञता सोहळा संपन्न.
कुर्ला पश्चिम येथील कराची हायस्कूल ही नामांकित शाळा दि.१४फेब्रुवारी १९६०रोजी कुर्ला पश्चिम येथील वाडीया इस्टेट, मगन नथूराम मार्ग येथे सुरू झाली. शिक्षणतज्ज्ञ द.वा.अणावकरगुरूजी, एन.जी.माने यांनी त्यावेळी सुरू केली होती.
१९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीमुळे कराची मधील मालमत्तेला मुकून मायदेशी भारतात निर्वासितांच्या म्हणून यावे लागले. महाराष्ट्रात परतल्यावर पुन्हा संस्थेचे आजीव सेवक एकञ आले.त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांनी कुडाळ येथे कराची हायस्कूल सुरू केले. कराची, कुडाळ,मुंबई- कुर्ला येथे शाळा सुरू केल्या. त्यांचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांना होतो आहे.
मी १९७४ - १९७७ साली आठवी ते दहावी शिक्षण घेतले त्यावेळी गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले ते घनश्याम पुजारी,ज्योत्स्ना रानडे,दत्ताञय हादगे, माणिक काळे,वसंत पारधी, बी.बी.सावंत, शरद बेहेरे, सुलभा ब्रम्हे , गंगाधर माने,रवी अणावकर , प्रभाकर आयरे विद्धा गाडी,बिंदू, सिंग या गुरूजनांनी आम्हा विद्यार्थ्यांना उत्तम शिस्त व शिक्षण दिले.
६० वर्षात हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले त्यांनी वयाची साठी सत्तरी पार केली आहे. ते बहुतसंख्य विद्यार्थी कृतज्ञता सोहळा आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते.
शुक्रवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२०रोजी सायंकाळी ४.०० वाजता शाळेच्या आवारात कृतज्ञता सोहळा आयोजित कार्यक्रमात माजी सेवा निवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे खासदार श्रीमती पूनम महाजन होत्या समारंभाचे अध्यक्ष इंद्रजित सावंत होते. द.वा अणावकरगुरूजीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यकमाची सुरूवात झाली. अवधूत रेगे यांनी मधुर गीते सादर केली.
१९८० दहावीच्या विद्यार्थ्यांनी रूपये ५१०००/ आर्थिक सहाय्य दिले, १९९८ दहावीच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे वाटप केले. डाॅ.गीता भाटीया यांनी रूपये २० लाख आर्थिक सहाय्य दिले,डाॅ. भारती व्यास यांनी रूपये १ लाख आर्थिक सहाय्य दिले.
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची प्रगती १९६१ कराची हायस्कूल, १९७९ कै.साकरबेन रवजीभाई गण्या पूर्व प्राथमिक शाळा, १९८१ हराम बागवे प्राथमिक शाळा, १९९३ शेठ ईश्वरदास हरिदास भाटीया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य विभाग. २०१८ स्वयंअर्थसाहीत विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय .एकूण २५ वर्गखोल्या असलेल्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य चालू आहे. सुमारे १५०० विद्यार्थी लाभ घेत आहेत.
सोहळा संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापिका कल्पना पिंजरकर, कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, दत्ताञय हादगे यांनी मेहनत घेतली. असे माजी विद्यार्थी महादेव गोळवसकर यांनी कळविले आहे.