मुंबईकरांची भूक भागवणारे डबेवाले संकटात तर शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा टीम धावली त्यांच्या मदतीला


शिवसेना नेते खासदार मा. गजानन कीर्तिकर साहेब व विभागप्रमुख परिवहन मंत्री ऍड. अनिल परब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम मार्फत राज्यसभा सदस्य मा. प्रियांका चतुर्वेदी व युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने अंधेरी पश्चिम मधील स्थानिक मुंबईच्या डबेवाले यांना जीवनावश्यक अन्नधान्य देण्यात आले. कोणत्याही संकटात न डगमगता मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या या डबेवाल्यांचं राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून  कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे.


 


 इतर वेळी मुंबईकरांची भूक भागवणारे डबेवाले या संकटात उपाशी राहू नयेत म्हणून शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया यांनी जीवनावश्यक अन्नधान्य (तांदूळ, गहू, आटा, तुरडाळ, गोडतेल, साखर, चहा पावडर, कांदे, बटाटे) वाटप केले. यावेळी सोशल डिस्टसिंग चे काटेकोरपणे पालन करण्यात आले.



शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकाण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र आज शिवसेना अखंड महाराष्ट्र राज्य मध्ये पार पाडत आहेत.


सध्या मद्दतीच्या नावाखाली काही लोक आपली प्रसिध्दी ची पोळी भाजण्याच्या नादात आहे तर त्याच वेळी मदत किट वर कोणतीही जाहिरात बाजी न करता गरजू लोकांना कशी आणि जास्तीत जास्त कश्या प्रकारे मदत करता येईल याच्या कडे शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा चे संघटक संजय कदम व समन्वयक सुनिल खाबिया जैन यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.