मातोश्री' परिसरात करोनाचा रुग्ण

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरातील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. 'मातोश्री'तील कर्मचारी या चहावाल्याच्या संपर्कात होते का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे.


अनिल परब म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या स्टाफशी संबंधित हा विषय नाही. 'मातोश्री'च्या बाहेर जे पोलीस असतात. इतर कर्मचारी असतात. त्यांच्यातील काही लोकांचा संशयित करोनाग्रस्ताशी थेट संपर्क आला असण्याची शक्यता आहे. या शक्यतांचा विचार करून त्यांच्यापैकी काही लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे आणि त्यांची तपासणी सुरू आहे.'