पत्रकार सुरक्षा समितीची पोलीस आयुक्त बरोबर चर्चा
सोलापूर /करोना या रोगाच्या पार्श्वभूमिवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने दिनांक 15 मार्च पासून शहरात जमाव बंदी व संचार बंदी लागू केली असून या बंदी काळात पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन तसेच सर्व सामान्य जनतेला कोरोना बाबत पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार वेळोवेळी मार्गदर्शन, सूचना आदेश निर्देश देत आहे या बाबत पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वाची असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन मधील एकमेव दुवा पत्रकार आहे
*दिनांक 15 मार्च ते 31मार्च पर्यंत* शहरातील साप्ताहिक व युट्युब चॅनल च्या अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय वतीने पासेस देण्यात आले होते
*दिनांक 1 एप्रिल पासून साप्ताहिक व युट्युब चॅनल च्या पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी पासेस नाकारण्यात आले होते याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे पासेस बाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या.
याच तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर चे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन *शहरातील साप्ताहिक व युट्युब चॅनल च्या पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी पासेस देण्याबाबत चर्चा करण्यात करण्यात आली* यावेळी पत्रकारांना पासेस देण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे ठोस आश्वासन पत्रकार सुरक्षा समितीला देण्यात आले .
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार प्रसाद जगताप संजीव धडके अल्ताफ शेख अक्की बबलाद प्रसाद ठक्का विजयकुमार उघडे ढोणे सह अनेक पत्रकार उपस्थित होते