लॉकडाऊन उठवणं शक्य होईल का

महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत सर्वांनीच स्वयंशिस्त पाळायला हवी. गर्दी टाळलीच पाहिजे. असं झालं नाही तर १५ एप्रिलला लॉकडाऊन उठवणं शक्य होईल का? याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. 'आरोग्यासारखी दुसरी धनसंपदा नाही. त्यामुळे सर्वांनी व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि शरीर सुदृढ व निरोगी ठेवा. उद्या हनुमान जयंती व शब-ए-बरात आहे. या सणांनिमित्त सर्वांनी घरूनच आपली श्रद्धा व भावना व्यक्त करा, कोणीही घराबाहेर पडू नका,' अशी विनंतीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.