शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा टीमचा एक हात मदतीचा
जैन ट्रेड इंटरनॅशनल ऑर्गनाइझशन (जितो), अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, सदभावना सेवा समिती यांच्या सोबत करत आहे लाख मोलाची कामगिरी
विभागातील नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा दिवसरात्र मेहनत घेत प्रत्येकाच्या मदतीसाठी झटत आहेत.
शिवसेनापक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार मा. श्री गजानन कीर्तिकर व परिवहन मंत्री, विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ची संपूर्ण टीम अहोरात्र काम करत आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मोठ्या प्रमाणात कार्य करत असून संपूर्ण टीम अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकात्मतेने जोमात सेवा पुरवत आहेत. सेवाकार्याचा लवाजमा बघत अनेक समाजसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या असून शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत आपल्या सेवा पुरवित आहेत. जैन ट्रेड इंटरनॅशनल ऑर्गनाइझशन (जितो), अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, सदभावना सेवा समिती यांसारख्या अनेक संस्था व स्वतंत्र व्यक्ती सहकार्य करत आहेत. खालील सेवा देण्यात येत आहेत.
*१. दररोज ४२०० बेघर व गरजू लोकांना जेवणाची व्यवस्था.*
*२. ८००० गरीब परिवाराना जीवनावश्यक खाद्यपदार्थ (तांदूळ, गहू, आटा, तुरडाळ, गोडतेल, साखर, चहापावडर, कांदे, बटाटे इ.) चे वाटप.*
*३. विभागातील पोलीस कर्मचारी, महापालिका, प्रशासकिय, बेस्ट कर्मचारी व लोकांना ३००००(तीस हजार) मास्क व सॅनिटायझर चे वाटप*
*४.विभागातील सर्व इमारती व झोपडपट्टी मध्ये १६ निर्जंतुकीकरण पंपाच्या आधारे फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत*
*५. अहोरात्र सेवा देणाऱ्या हॉस्पिटल, महानगरपालिका, प्रशासकीय, पोलीस कर्मचारी, सेवाभावी लोक यांच्या दैनंदिनीत क्षणिक गोडवा आणण्यासाठी कसबे सुकेने निफाड नाशिक येथील ३००० किलो मधुर द्राक्ष चे वाटप करण्यात आले*
*६. युवासेना मार्फत आपत्कालीन परिस्थितीत परिसरातील गरोदर महिला, वयस्कर व्यक्ती, रुग्णांना रुग्णवाहिकेची मोफत सेवा*
*७. आवश्यकतेनुसार कूपर रुग्णालयात रक्तदान करण्यात येत आहे.*
*८. अंधेरी पश्चिम युवासेना मार्फत स्वस्त ताजी भाजी मंडई ची व्यवस्था*
*९. कूपर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी व खाजगी डॉक्टर यांना * ****** *किट देण्यात आले*
*९. गरजेनुसार बिस्कीट वाटप, खाद्यपदार्थ वाटप, अत्यावश्यक सेवा, रुग्णसेवा, अन्य सेवा देत आहोत*
शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम च्या सर्व ७ शाखा, सर्व पुरुष- महिला विधानसभा पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, अन्य पुरुष - महिला पदाधिकारी, युवासेना, शिव सहकार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व सर्व शिवसैनिक सरकारच्या टाळेबंदी नियमांचे पालन करत सर्व गरजू लोकांना मदत करत आहेत. तसेच संवेदनशील पणे मदतकार्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन यांचे कसदार संयमी नेतृत्व ही संकटाची वेळ अगदी शिताफीने हाताळत आहेत.
महिला विधानसभा संघटक विणा टॉक, महिला विधानसभा समन्वयक स्वाती घोसालकर, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, संजय पवार, शरद जाधव, महिला उपविभाग संघटक संजीवनी घोसाळकर, रंजना पाटील, भावना मांगेला, युवासेना विभाग अधिकारी योगेश गोरे विविध सेवा देत आहेत. तसेच शाखाप्रमुख दयानंद कड्डी, उदय महाले, दीपक सणस, सुधाकर अहिरे, संजय साखळे, संजय जाधव, शरद प्रभू व शाखाचे सम्पूर्ण टीम अत्यंत मेहनत व सचोटीने सदभावनेने काम करत आहेत.
विभागातील दत्तगुरु वाल्मिकी परिसर, म्हातारपाडा, गिल्बर्ट हिल, गावंदेवी परिसर, जुहू गल्ली, अंधेरी स्टेशन, पालिराम पथ, एस व्ही रोड परिसर, भवन्स कॉलेज, शितलादेवी, इंदिरानगर, जुहू ताज, जुनेदनगर, खजूरवाडी, जनता कॉलनी, अमन सोसायटी, रोशन नगर, सागर सिटी, धनगर वाडी परिसर, शिवाजीनगर, कपासवाडी, जे पी रोड, नेहरूनगर, फादरवाडी, अमृतलाल वाडी, प्रेमनगर, इंदिरानगर नं १, गावठाण, शिवाजीनगर, इंदिरानगर, लोहियानगर, गणेश सोसायटी, जुहू कोळीवाडा व अन्य ठिकाणी नियमितपणे जेवण पुरविले जाते आहेत.